जळगाव जिल्ह्यात  37 (3) कलम जारी

On: March 8, 2022 8:15 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 23 मार्च, 2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) जारी करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश लग्न समारंभ, व प्रेत यात्रा, यांना लागू राहणार नाही असे राहुल पाटील अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment