सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी; बहुजन समाज पार्टी अध्यक्षा मायावतींचे ट्विट

On: July 30, 2020 5:59 PM

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर नुकताच गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बिहार पोलिस चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबाआय चौकशी होण्याची मागणी ट्विटद्वारे केली आहे. या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र किंवा बिहार पोलिसांऐवजी सीबाआयद्वारे होणे योग्य असल्याचे मायावती यांनी आपल्या ट्विटमधे पुढे म्हटले आहे.
सुशांत राजपूत आत्महत्येबाबत दोन राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका बघता या प्रकरणाच्या आडुन आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका मायवती यांनी काँग्रेसवर केली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने गांभिर्य दाखवण्याचे मत देखील मायवती यांनी व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment