प्रियकराने धमकावले ; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न

On: August 1, 2020 5:24 PM

मीरारोड : लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची भाषा केल्याने प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भाईदरमधे घडली. प्रेयसीने घरातील फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रियकरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीचे तिच्या घराजवळ राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

तरुणी अल्पवयीन असतांना तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवले. या तरुणाने दोन वर्षा पूर्वी दुसऱ्या तरुणीसोबात लग्न केले. मात्र तरीदेखील तरुणाने त्या तरुणीसोबत प्रेमसंबंध कायम ठेवले . 25 जुलैच्या रात्री दोघेही बोरिवली येथील एका लॉजमध्ये मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी दोघे परत आले मात्र दरम्यानच्या कालावधीत तिच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार भाईंदर पोलीस स्टेशनला दिली होती.

त्यामुळे 30 जुलै रोजी तिने भाईंदर पोलीस स्टेशनला जबाब नोंदवला. पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यास सोडणार नाही असे त्याने तिला धमकावले. त्रस्त झालेल्या तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास घरातच फिनाईल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिचा जवाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment