कंटेनर – कारचा भिषण अपघात चार जागीच ठार, एक गंभीर

On: August 2, 2020 11:12 PM

खामगांव-अकोला मार्गावरील कोलोरी गावानजीक कंटेनरच्या धडकेत कार मधील चौघे जण जागीच ठार झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. अपघातग्रस्त कार अकोल्याच्या दिशेने तर कंटेनर खामगावच्या दिशेने जात होता. जखमीस पुढील उपचारासाठी शहरातील सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.

एमएच२७ एआर ३६३२ ही कार अकोल्याकडे जात होती. दरम्यान गव्हाण फाटयाजवळ खामगावकडे जाणारा आरजे-१८ जीबी २५८९ या क्रमांकाच्या कंटेनरने कारला जोरदार धडक दिली. या दुर्दैवी अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. त्यातील एक गंभीर जखमी झाला आहे. ठार झालेल्यांमध्ये अकोल्याच्या शिवनगर भागातील विनोद शंकरराव बावणे (५०), पप्पू मनोहर जोशी (४५), अतुल शंकरराव व्यवहारे (४७), राहुल सातळे (४०) यांचा समावेश आहे. अनिल मावळे हा गंभीर जखमी झाला आहे.

त्यास उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. कार मधील मृतदेह गॅस कटरच्या मदतीने पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती समजताच खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक शेख, पोहेकॉ. खर्चे, जावेद गवई, खोले यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment