गोळीबारानंतर सापडला तरुणाचा मृतदेह

On: August 3, 2020 2:43 PM

नांदेड : नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील गाडेगाव रस्त्यावर रविवारी रात्री गोळीबार झाला होता. गँगवारच्या प्रकारातून झालेल्या या घटनेतील एका आरोपीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. घटनास्थळावर पादत्राणे व रक्त सांडल्याचे दिसून आले. आरोपींनी केलेल्या गोळीबारानंतर जखमी झालेल्या दुसऱ्या टोळीतील एकाचे अपहरण केले होते. पोलिस पथकाने रात्र पिंजून काढण्यासह शहरातील प्रत्येक भागात नाकाबंदी केली होती.

दरम्यान आज सकाळी हसापूर भागात नदीच्या पुलाखाली जखमी विक्की चव्हाण या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी कौठा भागात विक्की चव्हाण याच्या टोळीने दुसऱ्या गटावर तलवार हल्ला केला होता. गॅंगवॉर मधूनच ही खूनाची घटना घडल्याचे म्हटले जात आहे. मयत विक्की चव्हाण याच्यावर विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment