रामानंद नगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

On: August 5, 2020 10:24 PM

जळगाव :  जळगाव शहराच्या पिंप्राळा परिसरातील सोमानी मार्केट भागात कल्याण मटका व जुगार खेळला जात असतांना रामानंद नगर पोलिसांनी सट्टा बुकींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पो.नि. अनिल बडगुजर यांना मिळालेल्या माहितीनुसार सहायक फौजदार गोपाल चौधरी, विजय खैरे, भुषण पाटील, होमगार्ड तुषार नेवे यांच्या पथकाने या छाप्याची कारवाई केली. जनराज बंसी भोई, संभाजी श्रीपत सैंदाणे यांना ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तिन हजार तिनशे विस रुपये रोख व सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment