कुलगाम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे सरपंच सज्जाद अहमद खांडे यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सज्जाद अहमद खांडे हे बीजेपी चे नेते होते. यापुर्वी जून मधे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडित यांची देखील हत्या केली होती.
कुलगाम जिल्हयाच्या वेसू येथे सज्जाद अहमद खांडे यांच्यावर घराबाहेर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने त्यात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वीच त्यांची जिवनयात्रा संपली होती.
काश्मीर खोऱ्यात दोन दिवसात सरपंचांवर जिवघेणा हल्ला झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी कुलगाम जिल्हयाच्या मीरबाजारच्या अखरण भागात सरपंच पीर आरिफ अहमद शाह यांच्यावर देखील दहशतवाद्यांनी जिवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात ते ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत.