बलात्काराचा आरोप ; रा.कॉ. कार्यकर्त्यावर गुन्हा

On: August 6, 2020 10:46 PM

नागपूर : सहकारी महिलेने राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यावर बलात्काराचा आरोप लावत पोलिसात गुन्हा दाखल केल्याचा प्रकार नागपुरात घडला. 45 वर्ष वयाच्या एका महिलेने या प्रकरणी पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल केला.

सोहेल पटेल (55) असे आरोप असलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. सोहेल हा जाफर नगर परिसरात राहतो. तो विवाहीत असून रा.कॉ. चा कार्यकर्ता आहे. पक्षाचे काम करणा-या सह्कारी महिलेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. या महिलेसोबत त्याची सन 2018 मधे ओळख झाली होती.

गुन्हा दाखल करणारी महिला देखील विवाहित असून तिला देखील मुले आहेत. दोघात ओळख झाल्यानंतर त्यांनी सन 2019 मधे शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे समजते. पाचपावली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर नगराळे तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment