नकली वर्दी पोलिसांची…. असली काम लुटमारीचे

On: August 7, 2020 12:22 AM

पुणे : अंगावर खाकी वर्दी घालून सोन्याच्या दुकानात लुट करणाऱ्या चोरट्यांचा प्रयत्न सराफ दुकानदाराच्या सावधानीमुळे फसला. मात्र परत जातांना आरोपीने हवेत फायर केला. सुदैवाने या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या कापूरहोळ येथील बालाजी ज्वेलर्स या सराफी दुकानात पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी लुटमारीचा असफल प्रयत्न केला.

सराफ दुकानदाराच्या हुशारीने चोरट्यांचा डाव फसला. जातांना आरोपीने हवेत फायर केला. दुपारच्या वेळी पोलिस वेशात आलेल्या लुटारुने तुम्ही चोरीचे दागिने खरेदी करतात असा आरोप केला. दरम्यान धमकावत त्याने दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने एका थैलीत भरण्यास सांगितले. दुकानदारास संशय आल्याने त्यांनी आरोपीला उलट विचारणा सुरु केली. दरम्यान आरोपीच्या लक्षात आल्याने त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

सराफाने त्याला पकडले मात्र आरोपीने हवेत गोळीबार करत पलायन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खरे पोलीस आले. राजगड पोलिसांचे गुन्हे शोध पथक घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी ज्वेलर्स मधील सीसीटीव्ही फुटेज तपासकामी ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment