धनुष्यबाण कुणी हिरावू शकत नाही – उद्धव ठाकरे

On: July 8, 2022 5:01 PM

मुंबई : जेवढे नगरसेवक तिकडे गेले ते नगरसेवकच नाही. महत्वाचे म्हणजे आता महापालिका अस्तित्वात नाही. त्यामुळे म्हटलं तर हे त्यांचे व्यक्तिगत कार्यकर्ते असू शकतात. त्यांच्याच आग्रहामुळे मी माझ्या निष्ठावान शिवसैनिकांना बाजूला ठेऊन त्यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी दिली होती.

मातोश्री या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसार माध्यम प्रतिनिधींसोबत उद्धव ठाकरे बोलत होते. कायद्याच्या दृष्टीने धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत नाही असे पुढे बोलतांना ठाकरे यांनी म्हटले. नुसत धनुष्यबाण चिन्ह असलेल्या माणसाचा लोक मतदानात विचार करतात. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही. नगरसेवक गेले परंतु महापालिका अस्तित्वात नाही. गेले ते त्यांचे समर्थक होते, असंही त्यांनी बोलतंना म्हटले. शिवसेनेने आजपर्यंत साध्या माणसाला मोठे केले याचा मला अभिमान आहे. ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. साधी माणसं जोपर्यंत शिवसेनेसोबत तोपर्यंत शिवसेनेला धोका नसल्याचे देखील ठाकरे यांनी बोलतांना म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment