सुशांतच्या प्रकरणात दिशाचा सहभाग?

On: August 7, 2020 10:04 PM

मुंबई : सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचे प्रकरण चर्चेत आले आहे. सुशांत आणि दिशाचे प्रकरण एकमेकांसोबत जुळलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात दिशाचे नाव जोडले जात असल्याचे बघून त्यावर त्याच्या वडीलांनी आक्षेप घेतला आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्ये प्रकरणी एक खुलासा केला आहे. मृत्यूपुर्वी दिशा तिच्या एका मित्रासोबत फोनवर जवळपास 45 मिनिटे बोलली होती. या संभाषणात तिने तिच्या व्यावसायीक जिवनातील अनेक बाबी शेअर केल्या आहेत. याबाबत नेमकी माहिती समजू शकली नाही.

8 जुन रोजी मुंबईतील एका बिल्डींगमधून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर दुस-या दिवशी तिचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तेथे तिची कोविड तपासणी निगेटिव्ह आली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment