जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 25 जिल्ह्यात स्थगीत

On: August 5, 2022 7:30 PM

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधे केलेल्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज 5 ऑगस्ट रोजी स्थगित केली आहे. या बदलाबाबतचा अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या जागांच्या संख्येत देखील बदल करण्यात आला आहे.

सध्याची मतदार विभाग आणि निर्वाचक गणांची रचना आणि आरक्षणाची प्रक्रियादेखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्‍य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. सध्या 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती.

याबाबत राज्य निवडणूक आयोग लवकरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आदेश देणार आहेत. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment