गहू चोरल्याने वडीलांनी मुलाला टांगले उलटे

On: August 9, 2020 3:58 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या आग्रा नजीक एका गावात वडीलांनी मुलाला त्याच्या  चुकीची शिक्षा म्हणून उलटे टांगून मारहाण केल्याची घटना घडली. मुलाने घरातील गहू चोरल्यामुळे संतप्त वडीलांनी मुलाला उलटे टांगून मारहाण केल्याच्या घटनेचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे.  पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत मारहाण करणा-या वडिलांना अटक केली आहे.

गुड्डू खान असे आरोपी वडिलांचे नाव आहे. खान यांना रमजानी नावाचा दहा वर्षाचा एक मुलगा आहे. त्याने घरातील गहू चोरुन विकले होते. आलेले पैसे त्याने खर्च केले होते.  त्याच्या या कृत्याची शिक्षा म्हणुन गुड्डू खान यांनी मुलगा रमजानी यास घरात दोरीने उलटे टांगून बेदम मारहाण केली. 

या घटनेमुळे रमजानी याचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज ऐकून हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान काही जणांनी या मारहाणीचा व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला. पोलिसांनी मारहाण करणा-या पित्यास अटक केली आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment