मन्नेवार  समाजाचा चौथा वर्धापन दिन उत्साहात

On: August 19, 2022 7:21 PM

जळगाव : मन्नेवार समाज जागृत महिला समितीचा चौथा वर्धापन दिन भुसावळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सौ. सुनिता मायकल अध्यक्षस्थानी होत्या. मन्नेवार  समाज भवनात झालेल्या या कार्यक्रमाला महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर श्रीकृष्ण पेंडले आणि मन्नेवार समाजाचे ज्येष्ठ सदस्य दिनेश दासजी यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रम सुरु करण्यापुर्वी दिप प्रज्वलन करण्यात आले.

सांस्कृतीक कार्यक्रमाचे देखील याप्रसंगी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मन्नेवर समाजाचे युवा सदस्य चि. चेतन बुंदेल, कु. पूर्वा बुंदेल, चि. ओम मायकल, चि. लकी तेलंग आदी बाल कलाकारांनी राधा – कृष्णाची वेशभूषा केली होती. खुशी मायकल हिने भारतमातेची तसेच तन्मय दासरे याने बिरसा मुंडा यांची वेशभुषा केली होती. मन्नेवार समाजाच्या माजी अध्यक्षा सौ. विजयलक्ष्मी स्वामीजी यांच्या हस्ते विद्यमान अध्यक्षा सौ. सुनिता मायकल, उपाध्यक्षा सौ. बबिता दासजी, कोषाध्यक्षा सौ. विजया नटकर, सौ. रत्ना मायकल आदींचा गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.

एसएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कु.निधी बुंदेला आणि कु. श्वेता अत्राल या समाजातील दोघा विद्यार्थीनींना बक्षीस देण्यात आले. याशिवाय सर्व लहान मुलांनाही बक्षीस देण्यात आले. महिला समितीतर्फे सर्व महिला व पुरुष सदस्यांना अल्पोपाहार देण्यात आला. महिला समितीच्या अध्यक्षा सौ.सुनीता मायकल यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment