भावाची हत्येनंतर सासरवाडीत लपला तिघा साथीदारांसह पोलिसांना गवसला

On: August 11, 2020 10:25 PM

नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेवरुन बहुतेक ठिकाणी वाद होत असतात. काल रात्री अशाच मालमत्तेच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून लहान भावाने साथीदारांसह संपवण्याचा प्रकार झाला होता. हत्या करणा-या मुख्य आरोपीस त्याच्या तिघा साथीदारांसह पोलिसांनी आज मोर्शी (जि. अमरावती) येथून अटक केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जयहिंद नगरात काल रात्री ही घटना घडली होती.

अमीन अली सय्यद अली (४१) असे मयताचे नाव आहे. अमीन याच्या ताब्यात मानकापुर येथे वडिलोपार्जित दुमजली घर आहे. त्याचा एक भाऊ खालच्या मजल्यावर तर दुसरा वरच्या मजल्यावर राहतो. या ठिकाणी  दोन दुकाने भाड्याने देण्यात आली आहे. दोन्ही दुकानाचे येणारे भाडे अमीन आपल्याकडे ठेवून घेत होता. त्याचा लहान भाऊ (आरोपी) सय्यद आसिफ सय्यद अली हा एका दुकानाचे भाडे आपल्याला मिळावे म्हणून आग्रही होता. त्यासाठी तो अमिनसोबत वाद घालत असे.  गेल्या कित्येक दिवसांपासून दोघा भावात हा वाद सुरु होता. सोमवारच्या रात्री ९.३० वाजता या वादाला सुरुवात झाली.

दुकानाचे येणारे भाडे आणि मालमत्तेमधील हिस्सा देण्यास अमीन तयार नव्हता. त्यामुळे हा वाद दिवसागणीक वाढत होता. पुर्वनियोजन केल्यानुसार आसिफ हा त्याचा मेहुणा जावेद खान हबीब खान व त्याचे मित्र तमीज खान हफिज खान तसेच सादिक खान हबीब खान यांच्या सोबत आला होता. त्यांनी अमीनवर चाकूचे वार करण्यास सुरुवात केली. या वारात अमीन गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले.

या प्रकरणी मानकापुरचे पोलिस निरिक्षक गणेश ठाकरे यांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व मिळालेले आरोपींचे मोबाईल क्रमांक याचा आधार घेत सर्वांना मोर्शी येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ हा त्याची सासरवाडी मोर्शी येथे आपल्या हल्लेखोर साथीदारांसह लपून बसला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment