एलसीबी ची कारवाई धरणगाव येथे ट्रकसह पकडला गुटखा

On: August 12, 2020 11:28 AM

जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धरणगाव पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदा सुगंधी गुटखा वाहतुक करणारा ट्रक काल रात्री पकडण्यात आला. या कारवाईत शेख रफिक शेख रज्जाक (49‌)  रा धरणगांव व कपिल रविद्रसिंग राजपुत यांना अटक करण्यात आली. त्यांच्या कब्ज्यातून 23,33,880 रुपये किमतीचा अवैध पानमसाला गुटखा ट्रक सह त्याब्यात घेण्यात आला. त्यांच्या विरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 159/2020 भा.द.वि. 328,188,272,273 तसेच साथीचे रोग अधिनियम 3 व आपत्ती व्यवस्थापन सन 2005 चे कलम 51(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशाने केलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. बापू रोहोम व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक सुधाकर लहारे, सहायक फौजदार अशोक महाजन, सहायक फौजदार नारायण पाटील, पोहेकाँ. रामचंद्र बोरसे, पो.हे.काँ.रवींद्र घुगे, पो.ना. मनोज दुसाने, पो.ना.महेश महाजन, पोकाँ. परेश महाजन, पो.काँ.दीपक शिंदे चालक पो.ना. दिपक पाटील, पो. ना. प्रविण हिवराळे, पो. काँ.मुरलीधर बारी, पोना.रफिक शेख कालु ,पो.नाईक.दिपक सुरवाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

बघा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment