राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता पंधरा वर्षाखालील मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी

On: October 13, 2022 5:11 PM

जळगाव दि.13 प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आगामी काळात होणाऱ्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा मुलींच्या १५ वर्षाखालील संघाची निवड चाचणी रविवार, दि. १६ ऑक्टोबर ला जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जैन स्पोर्ट्स अकॅडमी क्रिकेट ग्राउंड, विद्या इंग्लिश स्कूलच्या मागे, जळगाव येथे ठेवण्यात आलेली आहे.

ज्या मुलींचा जन्म 1 सप्टेंबर 2007 ते 31 ऑगस्ट 2009 या दरम्यान झालेला असेल अशाच मुली निवड चाचणी करिता पात्र ठरतील. तरी सर्व इच्छुक खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेच्या दाखल्यासह, क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व स्पोर्ट शूज घालून रविवार, १६ ऑक्टोबर ला दुपारी 4 वाजता मैदानावर उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री. अरविंद देशपांडे (९४२२२७८९३६) व सहसचिव श्री. अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment