अल्पवयीन मुलीचा तिच्या आई व प्रियकराने केला विनयभंग

On: August 13, 2020 9:08 PM

पुणे : प्रेयसी महिलेच्या मुलीचा प्रियकराने विनयभंग केल्याचा प्रकार पुणे जिल्हयाच्या शिरुर येथे घडला. या प्रकारात पिडीत अल्पवयीन मुलीची आई देखील सहभागी झाली होती. या घटनेतील पिडीत मुलीच्या आईचा प्रियकर पिडीतेला त्याच्या मोबाईलमधील आक्षेपार्ह चित्रीकरण दाखवत असे. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा निर्माण होत असे.

याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनला पिडीत मुलीच्या आईसह तिच्या प्रियकरावर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पीडित अल्पवयीन मुलीची आई तिचा प्रियकर विजय पाटील यास नेहमी घरात बोलावून घेत असे. दोघे जण घरात मद्यपान करुन आक्षेपार्ह कृत्य करत असत. त्याचा पिडीतेच्या मनावर परिणाम होत असे. आई व तिच्या प्रियकराकडून होणारा अत्याचार सहन न झाल्यामुळे अल्पवयीन पीडितेने तिच्या आत्याच्या मदतीने शिरुर पोलिस स्टेशन गाठले.

या प्रकरणी रितसर फिर्याद दाखल करण्यात आली. शिरूर पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईसह तिचा प्रियकर विजय अर्जुन पाटील (रा. खारमळा शिरुर जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे करत आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment