आईस्क्रिममधे विष टाकून बहिणीची हत्या

On: August 14, 2020 5:43 PM

नवी दिल्ली : जगात राहण्यासाठी एकमेकांच्या मदतीची गरज असते. मात्र एकटे राहण्यासाठी एक तरुण थेट आपल्या कुटुंबाच्या जीवावर उठला. त्याने आईस्क्रिममध्ये विष टाकून आपल्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणाच्या लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कुटुंबातील इतर सदस्य वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल आहेत.

केरळच्या कासरगोडमध्ये हा प्रकार झाला आहे. एकटे राहता यावे यासाठी एका तरुणाने आपल्या परिवाराच्या आईस्क्रिममध्ये विष घातले. ते आईस्क्रीम सर्वांना खाण्यास दिले. बहिणीचा मृत्यू झाला आहे. तर तरुणाच्या वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. अल्बिन असे या तरुणाचे नाव आहे. त्यानेच आईस्क्रिमध्ये विष घातल्याचे कबूल केले आहेेे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment