मोटार सायकल चोरीतील दुस-या फरार साथीदारास अटक

On: November 28, 2022 1:30 PM

जळगाव : मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपी इश्वर सपकाळे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यापुर्वीच मोटार सायकलसह अटक केली आहे. दिपक भास्कर सपकाळे असे आता अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे.

शेतक-यांच्या बांधावरील मोटार सायकल चोरीप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अटकेतील आरोपी इश्वर सपकाळे याचा साथीदार तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपक भास्कर सपकाळे (रा. धामणगाव ता. जळगाव) हा धामणगाव येथे आला असल्याची गोपनीय माहिती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील सहका-यांना त्याच्या मागावर पाठवले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे आदींच्या पथकाने सापळा रचून दिपक सपकाळे यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. दिपक सपकाळे याच्याविरुध्द यापुर्वी जळगाव शहर आणि जळगाव तालुका पोलिस स्टेशनला मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment