खूनाचा राग मनात ठेवून शिवीगाळ करणा-या चौघांपैकी तिघांना अटक

On: December 13, 2022 8:25 PM

जळगाव : खूनाचा राग मनात ठेवून तरुणास अश्लिल शिवीगाळ करणा-या चौघांपैकी तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. पियुष ऊर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर (रा. तुकारामवाडी, जळगांव), रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव (रा. तुकारामवाडी, जळगाव), कुणाल ऊर्फ दुंड्या किरण कोळी (रा. साई सिटी जवळ, कुसुंबा – जळगांव) अशी जैनाबाद परिसरातून अटक करण्यात आलेल्या तिघा तरुणांची नावे आहेत.

दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील वैकुंठधाम नजीक पांचाळ गल्ली भागात आकाश सुकलाल ठाकुर हा तरुण त्याच्या मित्रासह उभा होता. त्यावेळी सुरज ओतारी याच्या खूनाचा राग मनात ठेवत पियुष ऊर्फ वाघ्या मुकुंदा ठाकुर, कुणाल ऊर्फ दुंड्या कोळी, रोहित ऊर्फ भाल्या उत्तम भालेराव आणि स्वप्निल ऊर्फ गोलु धर्मराज ठाकुर अशा चौघांनी दोघा मित्रांची वाट अडवत अश्लिल शिवीगाळ केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पो.ना किशोर पाटील, छगन तायडे, मुकेश पाटील, सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तिघांविरुद्ध यापुर्वी देखील मारामारीचे बरेच गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment