माता न तू वैरीणी; बाळाला सोडून मातेचे पलायन

On: August 15, 2020 5:32 PM

नाशिक : सुमारे चार महिन्याच्या बाळाला एकटे सोडून मातेने पलायन केल्याची घटना आज मालेगाव तालुक्यात आढळून आली. मालेगाव तालुक्यातील सोयगाव शिवारात शेतमालकाला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने ही घटना समोर आली.

रडणा-या उरुष जातीच्या बाळाचे हातपाय चिखलाने माखलेले होते. शेतमालकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने लागलीच पोलिसांना हा प्रकार कळवला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे बाळाचा जिव कुत्र्यांपासून वाचला. अन्यथा कुत्र्यांनी या बाळाचे लचके तोडले असते. त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. दरम्यान बाळाला एकटे सोडून पलायन करणारी ती मात कोण? तिने हा प्रकार कुणाच्या दबावाखाली केला? या प्रश्नांची उत्तर अजून अनुत्तरीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment