अनोळखी मयत इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन

On: December 23, 2022 10:10 AM

जळगाव : जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणा-या अनोळखी इसमाचे 17 डिसेंबर रोजी निधन झाले होते. दरम्यान त्याला जळगाव सामान्य रुग्णालयात मयत अवस्थेत दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. देवा म्हणून सिंधी कॉलनी परिसरात ओळखल्या जाणा-या या मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कार पोलिसांनी केले असून त्याच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन (0257-2210500) अथवा सहायक फौजदार राजेंद्र उगले (9923192640) याचेशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment