हॉटेल मध्ये झाला वाद , एक मयत व दोन जखमी

On: June 12, 2020 1:14 PM

जळगाव : येथील नेरी नाका परिसरातील हॉटेल मधे झालेल्या हल्ल्यात दोघे तरुण जखमी तर हॉटेल मालक मयत झाल्याची घटना आज घडली.प्राप्त माहितीनुसार काही तरुण नेरी नाका परिसरात धुडघुस घालत होते. दिसेल त्याला काचेच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार हे तरुण करत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असल्याचे समजते.हॉटेल आसोदा येथून जेवण आटोपून दीपक जगताप व पंकज वडनेरे हे हॉटेलच्या बाहेर येत होते.त्यावेळी काही टवाळखोर तरुणांनी हातातील काचेच्या बाटल्या हॉटेलच्या दिशेने फेकून मारल्या यात दीपक जगताप व  पंकज वडनेरे हे दोघे जखमी झाले. दीपकच्या डोक्याला, कानाला व गालाला जबर दुखापत झाली असून त्याला वीस ते पंचवीस टाके पडले असल्याचे समजते.पंकज वडनेरे यांच्या गालावर 5 ते 6 टाके पडले असल्याचे समजते.या हल्ल्यात हॉटेल मालक प्रदीप ज्ञानदेव चिरमाडे मयत झाले आहेत.शनी पेठ पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले असून जखमी तरुणांना रुग्णालयात रवाना केले असल्याचे वृत्त आहे.

Injured-Crime duniya

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment