बलात्काराच्या गुन्हयातील पिडीतेच्या मुलीला पेटवले

On: August 15, 2020 8:40 PM

अहमदनगर : बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याच्या रागातून दोघा संशयीत आरोपींनी पीडितेच्या 10 वर्षाच्या मुलीला पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली.

राजाराम तरटे आणि अमोल तरटे अशी या घटनेतील दोघा संशयीत आरोपींची नावे आहेत. दोघा संशयीत आरोपींनी पारनेर येथील आदिवासी समाजातील 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावरआरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मात्र संशयीतांनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यासाठी दडपण टाकले.

पीडितेने त्यांची मागणी मान्य केली नाही. त्यामुळे आरोपींनी अत्याचारित पीडितेच्या 10 वर्षाच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. वैद्यकीय उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment