यवतमाळ : प्रियकरासोबत विवाह करणा-या पत्नीचा पतीने खून केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत रहात असलेल्या पत्नीसोबत पतीचा नेहमी वाद होत असे. संतप्त पतीने पत्नीच्या प्रियकारांचा खून केल्याची खळबजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
रंगराव श्रावण घोटेकर (34) हा पत्नी व मुलांसह चाणी परिसरात रहात होता. रंगरावचा त्याच्या पत्नीसोबत नेहमी वाद होत होते. त्यामुळे पत्नीने रंगरावला सोडून दिले व प्रियकर गणेश शंकर टेकाम (34) याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहानंतर ती गणेश टेकाम सोबत राहू लागली.पत्नीने आपल्याला सोडून परपुरुषासोबत प्रेमविवाह केल्यामुळे रंगरावच्या मनात प्रचंड राग होता. या संतापाच्या भरात तो बुधवारी रात्री भोयर येथे गणेशच्या घरी गेला. त्याने गणेशसोबत वाद घालत त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत रंगरावच्या हातून गणेशचा मृत्यू झाला.
गणेश मरण पावला असल्याचे लक्षात येताच रंगराव तेथून फरार झाला. या घटनेनंतर रंगरावच्या पत्नीने यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला जावून घटनेची माहिती दिली. रंगरावच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी रंगराव घोटेकर यास अटक करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.






