दिग्गज फलंदाज चेतन चौहान यांचे निधन

On: August 16, 2020 7:38 PM

भारताचे माजी कसोटीपटू चेतन चौहान यांचे आज रविवारी निधन झाले. चेतन चौहान हे 73 वर्षांचे होते. चेतन चौहान यांना गेल्या महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

आज त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा भाऊ पुष्पेंद्र चौहाऩ यांनी दिली. किडनी फेल झाल्यानंतर त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवले गेले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत अखेर मालवली. गुरूग्राम मधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment