संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीला आग

On: August 17, 2020 10:14 AM

नवी दिल्ली : संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीमध्ये (Parliament Annexe Building) आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दल शर्थीचे प्रयत्न करत आहे.

अ‍ॅनेक्स इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची सात वाहने दाखल झाले असून ते नियंत्रण आगीवर मिळवत आहेत.आज सोमवारी सकाळी संसदेच्या अ‍ॅनेक्स इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचे म्हटले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment