बापाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

On: February 15, 2023 11:33 AM

जळगाव : अभ्यास करत बसलेल्या अल्पवयीन मुलीचा बापानेच खालच्या पातळीवर जावून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार बापाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसावद येथील 13 वर्षाच्या मुलीसोबत 13 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. त्यावेळी अल्पवयीन मुलगी घरात अभ्यास करत होती. त्यावेळी तिची आई घराच्या ओट्यावर झाडझुड करत होती. मुलीच्या बापाला अटक करण्यात आली आहे. भाग 5 गु.र.न. 63/23 भा.द.वि. 354, 354 अ, सह बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण कलम 8, 12 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे करत आहेत.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment