अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा वाढदिवस जल्लोषात

On: February 20, 2023 9:41 PM

जळगाव : जामनेर येथील प्रसिद्ध वकील अँड. विकास चौधरी यांचे पिताश्री अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा 21 फेब्रुवारी रोजी 42 वा वाढदिवस संपन्न होत आहे. जामनेर येथील हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा वाढदिवस घरगुती वातावरणात जल्लोषात साजरा करण्यात येत आहे.

अशोकदादा चौधरी यांचे जेष्ठ सुपुत्र अँड. विकास व त्यांची पत्नी योगिता, कनिष्ठ सुपुत्र प्रसन्न व त्यांची पत्नी तेजस्विनी, नातू लक्ष, अनुज, नात प्रतिज्ञा, मुली सविता, जान्हवी तसेच दोन्ही जावई आदींनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आहेत.

अशोकदादा चौधरी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की सहचारीणी शोभाताई यांच्यासोबत जिवनातील 42 वर्षाचा कालखंड कसा लोटला हे लक्षातच आले नाही. संसाराचा रहाटगाडा ओढण्याकामी शोभाताई यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा असल्याचे अशोकदादा चौधरी यांनी यावेळी आवर्जून सांगीतले. मुलांचे शिक्षण व पालणपोषण करतांना होणारी परवड हसतमुखाने झेलण्याचे कसब शोभाताई यांनी दाखवून दिल्याची भावना यावेळी अशोकदादा चौधरी यांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment