मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगारास अटक 

On: February 23, 2023 10:02 PM

जळगाव : चोपडा शहरात दोन आणि अमळनेर येथे एक अशा तीन मोटार सायकली चोरल्याची कबुली देणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजेश श्रीराम बारेला रा. मोहनपडावा ता. वरला जि.बडवाणी म.प्र.असे चोपडा येथून त्याच्या ताब्यातील मोटार सायकलसह अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

अटकेतील राजेश बारला याने दिलेल्या कबुलीनुसार चोपडा आणि अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ संदिप रमेश पाटील, पोना. प्रविण जनार्दन मांडोळे, पोना. परेश प्रकाश महाजन, पोकॉ. दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकॉ. प्रमोद शिवाजी ठाकूर आदींनी या तापासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment