जबरी चोरीसह विनयभंग या दोन गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: February 27, 2023 12:03 AM

जळगाव : जबरी चोरी आणि विनयभंग या दोन गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. केवल अनिल टाक रा. वाल्मिक नगर भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो रहात असलेल्या भुसावळ येथील वाल्मिक नगर येथूनत्याला अटक करण्यात आली आहे.

अटकेतील केवल अनिल टाक याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल झाल्यापासून तो फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार रविद्र नरवाडे, हे.कॉ. कमलाकर बागुल, अनिल देशमुख, पो.ना रणजित अशोक जाधव, पो.ना. श्रीकृष्ण खंडेराव देशमुख आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपासकामी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment