समाजसेविकेची फसवणूक – जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल

On: March 1, 2023 9:03 AM

जळगाव : केंद्र सरकारच्या तीस टक्के अनुदान योजनेतून गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळवून देण्याचे आमिष दाखवत समाजसेविकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मुरलीधर फेगडे आणि रोहन महेंद्र फेगडे (दोघे रा. मस्कावद ता. रावेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटच्या दुस-या मजल्यावर राहणा-या कथित विवाहीत नवोदीत समाजसेविकेने याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला धाव घेत आपली कैफीयत मांडली. या घटनेतील दोघांनी समाजसेविकेकडून तिन गरीब विद्यार्थ्यांच्या नावे लॅपटॉपच्या 70 टक्के रक्कम 95 हजार रुपये घेतल्याचे म्हटले आहे. अद्याप लॅपटॉल मिळाले नाही अथवा दोघांनी  पुर्ण रक्कम देखील समाजसेविकेला परत केली नाही. तगादा लावल्यानंतर केवळ दहा हजार रुपये समाजसेविकेला परत मिळाले. उर्वरीत 85 हजार रुपये परत मिळण्यासाठी समाजसेविकेने दोघांकडे तगादा लावून देखील मिळाले नाही. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार संजय बडगुजर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment