प्रेमिकेसोबत दुस-याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय – हॉटेलात चाकूहल्ला

On: March 2, 2023 11:55 AM

जळगाव : हॉटेलमधे काम करत असलेल्या तरुणीवर त्याच हॉटेलमधे काम करणा-या तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्या तरुणावर बाहेरच्या दुस-या तरुणाने चाकूहल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव मध्यवर्ती बस स्थानकालगत असलेल्या भजे गल्लीत 28 फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटने प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भजे गल्लीतील एका हॉटेलमधे एक तरुणी कामाला आहे. त्या तरुणीवर बस स्थानक परिसरात काम करणा-या दुस-या एका तरुणाचे देखील प्रेम असल्याचे म्हटले जात आहे. बस स्थानक परिसरात काम करणारा तो तरुण हॉटेलमधे काम करणा-या तरुणीला आपली प्रेमिका समजतो. आपल्या प्रेमिकेसोबत त्याच हॉटेलमधे काम करणा-या तरुणाचे देखील प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय आला.

त्या संशयातून भोजनालय वजा हॉटेलमधे काम करणा-या तरुणाला दुस-या कथित प्रेमवीर तरुणाने शिवीगाळ करत धमकी देत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय त्याच्या उजव्या हाताच्या पंज्यावर चाकूचे वार करुन जखमी केले. त्याचा मोबाईल जमीनीवर आदळून नुकसान केले. या घटनेप्रकरणी मारहाण झालेल्या हॉटेल कर्मचा-याने मारहाण करणा-या तरुणाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण दांडगे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment