वस्त्र फाडून महिलेचा विनयभंग – तिघांविरुद्ध कायद्याचे अस्त्र

On: March 24, 2023 10:30 AM

जळगाव : अंगावरील वस्त्र फाडून विवाहीतेचा विनयभंग केल्याची घटना जळगाव शहरातील शनी पेठ हद्दीतील भागात घडली. या घटनेचा जाब विचारणा-या विवाहितेच्या पतीच्या डोक्यात तुटलेली बॅट मारून दुखापत करण्यात आली. या घटनेप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला विंनयभंगासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील पिडीत विवाहीता आपल्या परिवारासमवेत राहते. 22 आणि 23 तारखेच्या मध्यरात्री दरम्यान घडलेल्या या घटनेत एकाने महिलेचा हात धरून तीच्या अंगावरील वस्त्र फाडले. दरम्यान विवाहितेचा पती तिचा बचाव करण्यासह जाब विचारण्यासाठी आला असता त्याला तुटलेल्या बॅटने मारहाण करण्यात आली. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. दरम्यान एका महिलेसह दुस-याने महिलेस शिवीगाळ करून जीवे ठार करण्याची धमकी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉन्स्टेबल परिष जाधव करत आहेत.      

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment