धारदार शस्त्राने वृद्धाची हत्या

On: March 24, 2023 2:05 PM

जळगाव : धारदार शस्त्राने वृद्धाची हत्या केल्याचा प्रकार आज सकाळी यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक या गावी उघडकीस आला आहे. या घटनेने यावल तालुक्यासह परिसरात खळबळ माजली आहे. भिमराव शंकर सोनवणे (60) असे हत्या करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. मयत भिमराव सोनवणे हे खासगी वाहन चालक असल्याचे समजते.

भिमराव सोनवणे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यासह दगडाने डोके ठेचण्याचा प्रकार देखील झाल्याचे दिसून आले आहे. किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नदीच्या पुलाखाली सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती समजताच फैजपूर उप विभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह यावल पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली. हा खून कुणी व कशासाठी केला याचा तपास सुरु आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment