घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे चौघे ताब्यात

On: March 27, 2023 10:17 PM

जळगाव : घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. याशिवाय एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. चौघांकडून  चोरी करण्याचे सहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

अकबर दगडू पटेल (रा. हरिविठ्ठल नगर आंबेडकर पुतळ्याच्या मागे जळगाव), अमोल संजय पाटील आणि ऋषीकेश  कैलास पाटील (दोघे रा. हनुमान मंदीराजवळ एमआयडीसी जळगाव) आणी एक अल्पवयीन अशी पोलिसांच्या ताब्यातील चोघांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. अल्ताफ पठाण, पोलिस नाईक चेतन सोनवणे, इमरान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, पो.कॉ. मंदार पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment