जळगाव जिल्ह्यातून भुसावळचे पाच गुन्हेगार हद्दपार

On: March 28, 2023 8:33 PM

जळगाव : टोळीने गुन्हे करणा-या जळगाव जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. बंटी परशुराम पथरोड, विष्णू परशुराम पथरोड, शिव परशुराम पथरोड, रवींद्र उर्फ माया माधव तायडे, हर्षल सुनील पाटील अशी भुसावळ शहराच्या वाल्मिक नगरातील रहिवासी असलेल्या आणि हद्दपार करण्यात आलेल्या पाच गुन्हेगारांची नावे आहेत.

लोहमार्ग भुसावळ, भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर, आदी पोलिस स्टेशनला या पाच जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. भुसावळ शहरासह लोहमार्ग पोलिस स्टेशन परिसरात या टोळीने दहशत पसरवण्याचे काम केले आहे. त्यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे भुसावळ शहर परिसरात नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या गुन्हेगारांविरुद्ध वेळोवेळी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. त्यांच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी त्यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment