जमलेले लग्न मोडल्याचा राग – एकावर चॉपरने पोटात वार

On: April 4, 2023 10:24 AM

जळगाव : प्रेमसंबंध असलेल्या मुलीसोबत जमलेले लग्न मोडल्याच्या रागातून एकाने दुस-यावर चॉपरने पोटात वार केल्याची घटना जळगाव शहरातील शिवाजीनगर पुलानजीक घडली. 2 तारखेला रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी 3 एप्रिल रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशनला खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चॉपरने वार करणारा तरुण आणि जखमी तरुण हे दोघे जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत एकाच परिसरात राहतात. प्रेमसंबंध असलेल्या मुलीसोबत प्रेमी तरुणाचे लग्न जुळले होते. मात्र जमलेले लग्न त्रयस्थ तरुणाने मोडल्याचा राग प्रेमी तरुणाच्या नातेवाईकाला आला. त्या नातेवाईक तरुणाने लग्न मोडणा-या तरुणावर चॉपरने हल्ला केला होता. त्या हल्ल्यात लग्न मोडणारा जखमी झाला. चॉपरने वार करणा-या तरुणास जळगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment