संशयित आरोपींना घेवून जाणारे खासगी वाहन उलटले?

On: April 5, 2023 12:52 PM

जळगाव : संशयित आरोपींना घेवून जाणारे खासगी वाहन उलटल्याची घटना जळगाव – यावल दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी घडली असल्याचे वृत्त समजते. या घटनेत काही पोलिस कर्मचाऱ्यांसह संशयित आरोपी जखमी झाल्याचे देखील समजते. जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

सुरुवातीला जखमींना जळगाव शहरातील आर आर विद्यालयानजीक आर्किड रुग्णालयात आणले गेले होते असे सांगण्यात येत आहे. मात्र या रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी असलेला पोलिस प्लॅन नसल्यामुळे जखमींना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे देखील वृत्त आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment