बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी रियाची काढली औकात

On: August 19, 2020 4:30 PM

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कथित आत्महत्येचा तपास सीबीआय कडे गेला आहे. त्या तपासात मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे असे म्हटले आहे. या निर्णयानंतर प्रतिक्रिया देतांना बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी हा अन्यायाविरुद्ध न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे बोलतांना त्यांनी रिया चक्रवर्तीची थेट औकात काढली आहे.

बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलण्याची रिया चक्रवर्तीची ‘औकात’ नाही असे भाष्य डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी केले आहे. आज बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत करत हा 130 कोटी जनतेच्या भावनांचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment