ट्रक परस्पर विकणा-या एजंटसह दोघांविरुद्ध गुन्हा

On: April 12, 2023 11:15 AM

जळगाव : ट्र्क मालक तरुणाचा विश्वास संपादन करुन त्याच्या मालकीच्या दोन्ही ट्रक परस्पर विकून दुस-याच्या नावे करणा-या आरटीओ एजंटसह दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास सिताराम राठोड (रा. लक्ष्मीनारायण नगर सावदा ता. रावेर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ब्रिजेशकुमार प्रकाश यादव ( रा. स्वामीनारायण नगर सावदा – रावेर) आणि शहादत अली यासीन अली (आरटीओ एजंट रा. फैजपूर ता. यावल) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. जळगाव आरटीओ कार्यालयात घडलेल्या या घटने प्रकरणी देवीदास राठोड या तरुणाने रामानंद नगर पोलिस स्टेशनला धाव घेत आपली कैफीयत मांडत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील करत आहेत.     

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment