भाजप कार्यकर्त्याच्या हुक्का पार्लरवर धाड

On: August 19, 2020 10:50 PM

मीरारोड : भाईंदर पश्चिम परिसरातील इमारतीच्या सदनिकेत भाजप कार्यकर्ता हुक्का पार्लर चालवत असल्याचे समोर आले आहे. या पार्लरमधील धाडीत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. मात्र भाजपा कार्यकर्ता पलायन करण्यात यशस्वी झाला.

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीत असलेल्या श्री सिद्धार्थ सोसायटीत असलेल्या आठव्या क्रमांकाच्या सदनिकेत बेकायदा हुक्का पार्लर सुरु होता. याबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या ठिकाणी छापा घातला. त्याठिकाणी कायद्याने बंदी असलेल्या तंबाखू मिश्रीत हुक्क्याची नशापाणी सुरु होती.
सुरेश अग्रवाल ( २२) , जितू मुलचंद गुप्ता ( ३१) , सलीम मेताफ शेख (२४) , अक्षय निर्मल कुमार त्रिवेदी ( २३) , साहिल अखतर खान ( १९), शहाबुद्दीन उर्फ सैफ इंतादूर रहमान ( २४) या भाईंदर भागातील रहिवासी असलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी भाईंदर भागातील राहणारे आहेत.

हुक्का पार्लर चालवणारा भाजपाचा कार्यकर्ता करण उर्फ राजा भरत जोशी (त्रिवेणी अपार्टमेंट, भाईंदर) हा पलायन करण्यात यशस्वी झाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment