चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस अटक

On: April 25, 2023 10:28 PM

जळगाव : एसटी वर्क्स शॉपमधे झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विशाल वाल्मिक जाधव (रा. लक्ष्मी नगर कानळदा रोड जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गेल्या वर्षी 20 सप्टेबर 2022 रोजी एसटी वर्क्स शॉप मधे झालेल्या चोरीप्रकरणी राजेश देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शंकर विश्वनाथ साबणे (रा. गेंदालाल मिल जळगाव) याला वेळीच अटक करण्यात आली होती. मात्र त्याचा साथीदार विशाल जाधव हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. फरार विशाल जाधव हा गेंदालाल मिल परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, सुनिल सोनार, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, किशोर पाटील, इम्रान सैय्यद, साईनाथ मुंडे आदींना पुढील कारवाईकामी रवाना केले होते. या पथकाने विशाल जाधव यास ताब्यात घेत अटक केली आहे.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment