दरोड्याच्या तयारीतील पाच जण ताब्यात

On: May 1, 2023 8:48 AM

जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. खुशाल विनोद पांडे,  नागेश प्रल्हाद सोनार, मयुर उर्फ विक्की दिपक आलोणे, दुर्गेश उर्फ पपई आत्माराम सन्यासी आणि वसीम हुसेन पटेल अशी पोलिसांच्या ताब्यातील पाचही जणांची नावे आहेत.

जळगाव शहरातील कोल्हे नगर परिसरातील शिव कॉलनीच्या शंभर फुटी रत्यावरील प्रतिक पार्क अपार्टमेंट नजीक हे पाचही जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असतांनाच पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 143/23 भा.द.वि 392, आर्म अ‍ॅक्ट 3,4,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी गावठी पिस्टल, काडतुस गुप्तीची मुठ, चाकू आदी मुद्देमाल मिळून आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment