सार्वजनीक जागी वाद घालणा-या युगलाविरुद्ध गुन्हा

जळगाव : जळगाव शहरात हॉटेल महेंद्रा नजीक सार्वजनीक जागी मोठमोठ्याने ओरडून वाद घालणा-या दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारीत झाला होता.

भर दुपारी हमरस्त्यावर मोठमोठ्याने वाद घालून एकमेकांना शिवीगाळ करणा-या या दाम्पत्याचा अनेकांनी व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. मात्र दोघांपैकी कुणीही पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यास आले नव्हते. सार्वजनीक जागी वाद घालून मोठमोठ्याने ओरडून शांतता भंग करणा-या दाम्पत्याचा एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास केला असता ते दोघे माधुरी सागर राजगिरे व सागर भिकन राजगिरे (दोघे रा. रामेश्वर कॉलनी जळगाव) असल्याचे उघड झाले.

दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भा.द.वि.160 मुंबई पोलीस कायदा कलम 112, 117 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर सावळे, इमरान सैय्यद, योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील व महिला पो.कॉ. मिनाक्षी घेटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाई करण्यात आलेल्या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाल्याचे समजते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here