सावदा येथे सायंकाळी तिघांकडून एकाचा खून

On: August 20, 2020 8:50 PM

जळगाव : सावदा येथील ख्वाजा नगर परिसरात आज सायंकाळी तिघा अज्ञात इसमांनी पन्नास वर्षाच्या व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली. रईस दिलदार चौधरी,उर्फ रईस दंगा (५०) असे खुन झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. मरिमाता मंदिर परिसरातील मागील बाजूस असलेल्या ख्वाजा नगर गेटच्या बाजूला असलेल्या बखळ जागेत हा खूनाचा प्रकार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. मयत हा मध्य प्रदेशातील लालबाग गुलाबगंज येथील मुळ रहिवासी असून तो गेल्या काही महिन्यापासून सावदा येथे रहात असल्याचे समजते. मयत रईस याचेवर बुरहानपुर येथील पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल असल्याचे समजते. सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment