गावठी पिस्टल, तलवारी, काडतुस बाळगणा-या दोघांना अटक

On: May 20, 2023 8:01 PM

जळगाव : विना परवाना गावठी पिस्टल, मॅगझीन आणि पाच तलवारींसह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील हतनुर येथून अटक केली आहे. दोघांना पुढील कारवाईकामी वरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयुर नारायण मोरे व कल्पेश राजु मोरे (रा. कंडारी ता. भुसावळ जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.  

मयुर नारायण मोरे हा त्याच्या घरात विनापरवाना गावठी पिस्टल, मॅगझीन आणि तलवारी बाळगून दहशत निर्माण करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सहायक पोलिस उप निरीक्षक अनिल जाधव, हे.कॉ. कमलाकर बागुल, जितेंद्र पाटील, अनिल देशमुख, जयंत चौधरी, महेश महाजन, दिपक पाटील, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, महेश सोमवंशी, इश्वर पाटील आदींना कारवाईकामी रवाना केले होते. अटकेतील दोघांना वरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment