बनावट नोटा बॅंकेत जमा करणा-याविरुद्ध गुन्हा

On: June 1, 2023 8:24 AM

जळगाव : बनावट नोटा ख-या व चलनी असल्याचे भासवून बॅंकेत सीडीएम मशिनद्वारे जमा करणा-या इसमाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु आत्माराम पाटील असे पारोळा तालुक्यातील चोरवड येथील गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

जिंतेंद्र किशोर खरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचशे रुपये दराच्यासहा नोटा मशिनच्या माध्यमातून तपासल्या असता त्या बनावट आढळून आल्या. पुढील तपास पोलिस नाईक योगेश जाधव करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment