गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

On: June 12, 2023 8:10 PM

जळगाव : काडतुसासह गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ शहरानजीक फेकरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. सागर बबन हुसळे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. फेकरी शिवारातील झेडटीएस परिसरात तो गावठी कट्ट्यासह येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार रवी नरवाडे, पो.ना. रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, चालक प्रमोद ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील सागर हुसळे याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment